Share

बच्चू कडू पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि….

Published On: 

🕒 1 min read

अकोला : करोना रुग्णांची संख्या वाढत असून नियंत्रण मिळवण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र करोना रुग्णांवर उपचार करत असून दुसरीकडे रस्त्यांवर पोलीसदेखील लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत आहेत.

पोलीस आपलं काम व्यवस्थित करत आहेत की नाही हे तपासण्यासाठी राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू स्वत: रस्त्यावर उतरले होते. बच्चू कडू यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशनच केलं.

कोरोनाबरोबर जगायला शिका, तो समूळ नष्ट होणार नाही : WHO

बच्चू कडू यांनी बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी कापड गुंडाळलं होतं. दुचाकीवर मागच्या सीटवर ते बसले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी बोलणं टाळलं. त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे विनंती करत होती.

‘मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा’

मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडलं नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न कर असल्याने सुनावलं. त्यामुळे बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कठोरपणे नियमांची अमजबजावणी केली जावी अशा सूचना दिल्या आहेत.

PM मोदींनी दिलेला कोरा कागद अर्थमंत्री कसा भरणार याकडे आमचे लक्ष : चिदंबरम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!