Share

‘मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा’

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

याचाच धागा पकडत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. ‘भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे ,देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज असल्याचं आव्हाड म्हणाले.

तसेच ‘मुंबईतील उद्योग,आरोग्य,कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांयांच्या पॅकेजचे शिवसेना खा. संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. तर मुंबईसाठी आता वेगळे पॅॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील श्रमिक, शेतकरी, लघु तसेच मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचे मोठे संकट असल्याने सध्या टीका करणे योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहायला हवे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!