मुंबई : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत अनेक विकसित देशांना या कोरोनाने कवेत घेतले आहे. तर या कोरोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश लस शोधत आहेत. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने या कोरोना बरोबर जगायला शिका आशा सूचना दिल्या आहेत. या व्हायरस HIV सारखा कायम राहणार आहे. तो समूळ नष्ट होणार नाही , असे WHO ने संगितले आहे.
याबाबत WHOचे मायकल जे रेयान यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही. त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले.
तसेच HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. करोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.
दरम्यान मागच्यावर्षी चीनच्या वुहान शहरातून या करोना व्हायरसचा उगम झाला. आतापर्यंत जगभरातील ४२ लाख नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसवर अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही. या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
#corona : मुख्यमंत्री ठाकरेंनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी घेतला ‘हा’ निर्णय
मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

