Share

PM मोदींनी दिलेला कोरा कागद अर्थमंत्री कसा भरणार याकडे आमचे लक्ष : चिदंबरम

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत टीका केली आहे. आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, काल पंतप्रधानांनी आम्हाला एक मथळा आणि कोरा कागद दिला. साहजिकच माझी प्रतिक्रिया देखील कोरी होती. आज आम्ही अर्थमंत्र्यांकडून भरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदावर नजर ठेवून आहोत. सरकार खरंच अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे की नाही हे याकडे आम्ही काळजीपूर्वक लक्ष्य देऊ, असा टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.

पुढे चिदंबरम म्हणाले की, कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू. गरीब, भुकेलेले आणि उद्ध्वस्त झालेल्या परप्रांतीय कामगारांना शेकडो किलोमीटर चालून आपल्या घरी पोहोचल्यावर काय मिळणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. तसेच खालच्या वर्गातील लोकांना (13 कोटी कुटुंबांना) खरंच काय मिळणार?, यावरही आमचं लक्ष आहे.

दरम्यान देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले.

यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे. आपण माध्यमांना हेडलाईन दिली पण गरिबांना हेल्पलाईनची गरज आहे, हे कधी देणार ? असा सवाल विचारण्यात आला आहे, असा सवाल सुरजेवाला यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

PM मोदींच्या पॅकेजवर रोहित पवार म्हणतात, गुंतवणूक केंद्री नको रोजगार केंद्री अनुदान द्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांंसाठी लॉकडाऊनच्या काळात सदाभाऊ खोत यांनी उभारले आंदोलन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!