मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल, अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत.
दरम्यान, अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे सत्ताधारी पक्षांचे धाबे दणाणले असून अनेक राजकीय नेत्यांनी यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर शरसंधान केले आहे. काल सीबीआय ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला कुठलीही नोटीस न देता ताब्यात घेतलं. त्यामुळं भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालंय, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- ‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी

