हैद्राबाद : दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन, कायदेशीर लढाईनंतर आज अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणार आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या यादीनुसार अयोध्येत भूमिपूजनसाठी सुमारे पावणे दोनशे पाहुणे येणार आहेत. त्यातील काही विशेष आहेत तर काही सामान्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे राज्यपाल आनंदी बेन पटेल, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत मंचावर उपस्थित राहतील. अशात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
असदुद्दीन ओवेसींनी आज बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ओवेसींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओवेसींनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेच्याविरोधात असल्याचे म्हटले होते.
#BabriMasjid thi, hai aur rahegi inshallah #BabriZindaHai pic.twitter.com/RIhWyUjcYT
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 5, 2020
दरम्यान, असुदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे, असेही ओवेसी त्यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्नार्थक रोखही औवेसी यांनी बोलून दाखवला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

