🕒 1 min read
Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे. याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद ! मुठभर ‘खोप्या’ तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद ! मुठभर "खोप्या" तील "देशी" गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 11, 2022
जितेंद्र आव्हाडांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखईल राज्य सरकारला सवाल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे, असे पाटील म्हणाले.
आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना सोमवारी घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला.
जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण –
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “फाशी दिली तरी चालेल, पण…”; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत प्रतिक्रिया
- Jayant Patil | “शिवरायांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, गुन्हा आहे का?” आव्हाडांना अटकेनंतर जयंत पाटलांचा सवाल
- Snowfall Destination | भारतामध्ये सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Chitra Wagh | “पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात” ; चित्रा वाघ भडकल्या
- Sushma Andhare | “आपला तो फेकू, दुसऱ्याचा तो पप्पू” ; सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
