Share

Jayant Patil | “शिवरायांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, गुन्हा आहे का?” आव्हाडांना अटकेनंतर जयंत पाटलांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे, असे पाटील म्हणाले.

आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना सोमवारी घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला.

अमोल मिटकरी यांची टीका –

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे. याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद ! मुठभर ‘खोप्या’ तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण – 

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!