सिडनी : सिडनीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 407 रनचं आव्हान दिलं आहे. 321-6 या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी चहानंतर आपला डाव घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 406 रनची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने 84 रन, तर पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने 81 रन केले. मार्नस लाबुशेन 73 रन करून आऊट झाला. चौथ्या दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने 103-2 अशी केली होती. आर.अश्विन आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी, तिसऱ्या दिवशी भारतीय संघ २४४ धावांवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या दिवस हा ऑस्ट्रेलिया संघाच्या पदरात पडल्याचे दिसून आले.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 94 रनची आघाडी मिळाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचे तब्बल तीन खेळाडू रन आऊट झाले. हनुमा विहारी, आर.अश्विन आणि जसप्रीत बुमराह रन आऊट होऊन माघारी परतले. तर पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या, जॉश हेजलवूडला 2 आणि मिचेल स्टार्कला एक विकेट मिळाली.
भारताकडून शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा 50 रन करून आऊट झाले. तर ऋषभ पंतने 36 रनची खेळी केली. रविंद्र जडेजा 28 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्माने 26 आणि अजिंक्य रहाणेने 22 रन केले. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथचं शतक, तसंच पुकोवस्की आणि लाबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर 338 रनपर्यंत मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाच्या अडचणीत आणखीन एक भर; मोहिंदर कौर यांनी दाखल केला मानहानीचा खटला
- बीड जिल्ह्य़ात २६ कावळ्यांचा मृत्यू ! राज्यात ‘बर्डफ्लूचा’ शिरकाव ?
- औरंगाबादेत 16 जानेवारीला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे लोकार्पण
- औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड
- अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री; चाकणकरांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

