मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या 73 वर्षीय आजींवर वाचाळ अभिनेत्री कंगना रनौतने 100 रुपयांसाठी आंदोलनात सहभागी झालेली शाहीनबागची ‘बिल्किस बानो’ अशी अपमानास्पद टिपणी केली होती. याप्रकरणी झालेल्या आपल्या अपमानाबद्दल पंजाबच्या वयोवृद्ध शेतकरी आंदोलक मोहिंदर कौर यांनी कंगनावर थेट मानहानीचा खटला आपल्या वकिलाद्वारे दाखल केला आहे. कंगनावरील या खटल्याची सुनावणी 11 जानेवारीला पंजाबचे स्थानिक न्यायालय करणार आहे.
कंगना रनौत
देशातील प्रत्येक आंदोलनावर आपली भडकावू प्रतिक्रिया देणाऱ्या कंगनामुळे आपली समाजात, गावात, शेजाऱ्यांत आणि नातेवाईकांत मोठी बदनामी होत आहे. त्यामुळे मला मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे, असे सांगून 73 वर्षीय मोहिंदर कौर यांनी कंगनाविरोधात बाठिन्दा येथे मानहानीची तक्रार दाखल केली आहे. कंगना कमली (पागल) आहे. मी आंदोलनात गेले होते ती शेतकऱयांना न्याय मिळावा या शुद्ध भावनेने. कंगनाने जरा गुरुबानीचा पाठ वाचावा आणि आपले वर्तन सुधारावे, असा वडीलकीचा सल्लाही कौर यांनी कंगनाला दिला.
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे.’ असं व्यक्तव्य कंगनाने के होत.
त्यावरच मोहिंदर कौर यांनी कंगनाला चंगेलच प्रतिउत्तर दिले होते. ‘मी स्वतः पंजाबमध्ये 13 एकर जमिनीची मालकीण आहे. मला 100 रुपयांसाठी आंदोलनात जाण्याची गरज नाही. तशीच वेळ आली तर मी कंगनाला माझ्या शेतावर मजुरी करायला ठेवू शकते. यानंतर आता मोहिंदर कौर यांनी या कंगना विरुद्ध खटला दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या विभाजनाचा काँग्रेसचा डाव; भाजप नेत्याचा हल्लाबोल
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- ..हा तर एमआयएमला बदनाम करण्याचा डाव-खा.इम्तियाज जलील
- ‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला
- ‘बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला’


