🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनावरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्ण शहरात दाखल होत आहेत. मात्र आता औरंगाबादकरच ग्रामीण भागात जाऊन तेथील लसींवर आपला हक्क स्थापित करतांना दिसून येत आहेत. लसीकरणात शहरातील केंद्रांवर मोठ्या प्रमाणात वेटिंग असल्याने येथील तरूण लसीचा डोस घेण्यासाठी ग्रामीणच्या केंद्रांवर धाव घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अपुर्या सुविधा, कोविन अॅपवरील नोंदणीत अडचणी येत असल्याने खेड्यापाड्यातील तरूण वर्ग मात्र लसीकरणापासून वंचित आहे.
कोरोनावर सध्यस्थितीत लस हाच एकमात्र पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारने लसीकरणावर अधिक भर दिला आहे. मात्र आवश्यकतेच्या प्रमाणात लसींच्या पुरवठ्याचा मोठा प्रश्न असल्याने लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणातच लसीकरणाची मोहीम शहर व ग्रामीण भागात राबवली जात आहे. पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे ही मोहीम बारगळली आहे.
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आणि तेव्हापासूनच सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाचे टार्गेट अर्ध्यावरच असताना तरूण वर्गाचेही लसीकरण सुरु झाल्याने शहरातील केंद्रांवर लस टोचून घेणारांची मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. लस आल्याचे कळताच शहरातील पालिकेच्या केंद्रांवर मोठी गर्दी होत असून पुरता गोंधळ उडत असल्याचे चित्र मागील पाच-सहा दिवसांपासून रोज पहायला मिळत आहे.
यातच आता शहरातील काही तरूणांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्र निवडताना ग्रामीण भागातील केंद्र निवडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. तसेच नंबर लागताच ग्रामीण भागातील केंद्रांवर जाऊन लसही घेतली जात आहे. विशेष म्हणजे तेथील आरोग्य यंत्रणाही कोणतीही चौकशी न करता शहरातील आलेल्यांना लस देत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने ग्रामीण भागातील तरूणवर्ग लसीकरणापासून वंचित राहत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या विश्वासू माजी आमदाराचं कोरोनाने निधन ! पवारांसह फडणवीसांनी व्यक्त केला शोक
- २०५२ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन नवीन पाणीपुरवठा योजनेत ‘या’ गोष्टींचा समावेश!
- ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेतील मोहन जोशींना कोरोनाची लागण
- ‘माझ्या कुटुंबीयांचा मृत्यू हा कोरोनामुळं नाही, तर अपयशी ठरलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळं झाला’
- अमिताभ बच्चन यांच्याकडून मदतीचा हात ; कोविड सेंटरला दिले तब्बल २ कोटी रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
