Share

अमिताभ बच्चन यांच्याकडून मदतीचा हात ; कोविड सेंटरला दिले तब्बल २ कोटी रुपये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधाचा तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांना अपुऱ्या औषधापोटी जिव गमवावा लागला आहे. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. या काळात अनेक मान्यवर मदतीसाठी पुढे आले.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत श्री गुरू तेगबहादुर कोविड सेंटरला त्यांनी कोविडग्रस्तांच्या कार्यासाठी चालवलेल्या कामाला दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दिल्ली शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

ही देणगी देतानाच शिखांच्या सेवाभावालाही अमिताभ बच्चन यांनी सलाम केला आहे, असेही सिरसा यांनी म्हटले आहे. या कोविड सेंटरमध्ये आता तीनशे खाटांचे रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. तेथील ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत अमिताभ बच्चन यांनी जवळपास रोजच फोन करून माहिती घेतली असेही त्यांनी कळवले आहे.

एवढेच नव्हे तर अमिताभ बच्चन यांनी विदेशातील आपले संबंध वापरून तेथून काही ऑक्‍सिजन सिलिंडर्स या केंद्रासाठी देण्याचीही व्यवस्था केली. दरम्यान, एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना अमिताभ बच्चन यांनी जागतिक समुदायाला भारताला मदत करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्याकडून २ हजार जेवणाची पाकिटे मुंबईतील वांद्रे झोपडपट्टी, बाबूलनाथ मंदिर, हाजीआली दर्गा आणि माहिम दर्गा परिसरातील गरजूंना दिली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!