Share

‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेतील मोहन जोशींना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई: सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सध्या देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक बॉलीवूडमधील कलाकार अडकल्याचे समोर येत आहे. अशातच आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मोहन जोशी यांनी इन्स्टास्टोरी शेअर करत लिहिले आहे की, घरात राहा आणि सुरक्षित राहा… मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. पूर्वी या मालिकेतील आजोबांची भूमिकेत रवी पटवर्धन यांनी काम केले होते परंतु त्यांच्या निधनानंतर आता ही भूमिका मोहन जोशी यांनीही अगदी उत्तमरीत्या साकारली आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत गोव्यात या मालिकेचे शूटींग सुरु होते. मोहन जोशीही शूटींगनिमित्ताने गोव्यात होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शूटींगची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच या मालिकेची टीम मुंबईला परतली होती. मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. नाटक, चित्रपट आणि टिव्ही मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील उत्तम कामं केल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!