महाराष्ट्र देशा टीम: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या औरंगाबादेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा नवखे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभव केला. २००९ च्या विधानसभेत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढून आमदार झालेल्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेत विजय मिळाल्याने, औरंगाबाद मध्य विधानसभेसाठी एम. आय. एम. चा उमेदवार कोण यावर आता शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.
२००९ च्या विधानसभेत शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल आणि भाजपच्या किशनचंद तनवाणी यांच्या हिंदू मत विभाजानामध्ये सहज विजय मिळवलेल्या इम्तियाज जलील यांच्या पक्षाला ही जागा राखण अवघड जाईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या विधानसभेला शिवसेना भाजप महायुतीद्वारे सामोरे जाईल असा अंदाज असल्याने यावेळी मतविभाजनाचा धोका टळण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा निश्चितच युतीच्या उमेदवाराला होईल अशी चिन्हे आहेत.
या वेळी एम आय एम च्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीच पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच एम.आय.एम च्या पारड्यात अतिरिक्त मत पडतील. याचा फायदा एम आय एम च्या उमेदवाराला होणार आहे. याठिकाणी सध्या शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, भाजपचे किशनचंद तनवाणी आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुइगळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.युतीची उमेदवारी कुणाच्या गळ्यात पडते यावर येथील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
