औरंगाबाद : गावागावात पाणी पोहोचावे यासाठी शासनाकडून अनेक पाणी योजना राबविल्या जातात. मात्र औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांना शासनाच्या या पाणी योजनांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. यातच जलजीवन मिशन ही अभिनव योजनादेखील अनेक गावात पोहोचलेली नाही.
तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, सय्यद कलीम सय्यद कोंदण, बबन कुंडारे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामूकाका शेळके, तालुक्यातील सर्व सरपंच, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सर्व ग्रामसेवक तसेच सर्व खात्याचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी तालुक्यातील लाडसावंगी, करमाड, गोलटगाव, सावंगी या चार जिल्हा परिषद सर्कलमधील गावांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जलजीवन मिशन कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले कि, अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाची माहिती गावातील ग्रामस्थांना तसेच गावगाडा चालविणाऱ्या पदाधिकारींपर्यंतही पोहोचलेली नाही. या योजनेंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर पाणी मिळण्याची तरतूद आहे. मात्र योजनेची माहितीच गावात पोहोचलेली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्वांची कानउघडणी केली. तर प्रत्येक घराला ५५ लिटर पाणीपुरवठा करणे, त्यानुसार गावकृती आराखडा तयार करण्याबाबत पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांनी योजनेचे महत्त्व व करावयाच्या कार्यवाहीबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले.
शेकटा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत काम मंजूर असूनही ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे बैठकीतून सांगण्यात आले. आताच टाकी गळू लागली आहे. लाईन कनेक्शन जोडलेले नाही. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नसून मागील तीन वर्षांपासून संथ गतीने काम सुरु आहे. याबाबत अध्यक्षा मीना शेळके यांनी, सदरील कामाची तपासणी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्याकडे केल्या. यावेळी रामू काका शेळके यांनीही मार्गदर्शन केले.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
