Share

स्मार्ट फोन नसलेल्यांसाठी औरंगाबाद मनपाने ‘आधार कार्ड दाखवा, लस मिळवा’ मोहीम सुरु करावी-आप

Published On: 

औरंगाबाद : नागरिकांना पहिला डोस घेण्यासाठी कोविन ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक असल्यामुळे सामान्य नागरिकांना खूपच त्रास होत आहे. ज्यात बिगारी काम करणारे, भाजीपाला विकणारे, मजुरी करून पोट भरणारे यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे अडचणी येत आहेत. आणि यामुळे त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीद्वारे सामान्य नागरिकांना आधार कार्ड दाखवून लस मिळवा हा उपक्रम चालू करण्यात यावा अशी मागणी मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कसर्र्, जेष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि १८ वर्षांवरील नागरिक अशी टप्प्याटप्प्याने लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात औरंगाबाद पालिकेने शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ११५ वॉर्डात प्रत्येकी एक या प्रमाणे लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे.

लसींच्या तुटवड्यामुळे सद्यस्थितीत शहरातील केवळ पाच केंद्रांमध्ये लसीचा पहिला डोस दिला जात आहे. तसेच कोबी नंतर ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय पहिला डोस दिला जात नाही मात्र सामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची यामुळे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील मोठ्या लोकसंख्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळे महापालिकेने आधार कार्ड दाखवा आणि लस मिळवा अशी मोहीम सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!