🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मनसेच्या ५३ कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिलेला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या(Raj Thackrey) दौऱ्यात औरंगाबादमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे (Suhas Dashrathe) यांची हकालपट्टी करून तरुण असलेल्या सुमित खांबेकर(Sumit Khambekar) यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. त्यामुळे शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी सुरू झाली असून त्याचाच परिणाम म्हणून कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर आम्ही केवळ राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमांवर दाशरथे समर्थक राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध करतांना दिसून येत आहे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या या निर्णयास विरोध करत त्यांनी केलेली नियुक्ती कशा प्रकारे चुकीचे आहे हे सांगण्याचा सपाटाच लावला होता.
मात्र मंगळवारी नवनियुक्त कार्यकारिणीने सुहास दाशरथे गटातील कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. शहरात पक्षाला बदनाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे जाहीर केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या पत्रकानंतर हकालपट्टी केलेल्या माजी कार्यकर्त्यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये पक्षातून हकालपट्टी झालेले माजी जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नाराज कार्यकर्ते एकत्र आले असून आता पक्षाचे आम्ही सगळे नाते तोडल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र यापुढे कोणत्याही पक्षात न जाता आम्ही राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
