औरंगाबाद : गेल्या १५ दिवसांपासून शहरात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. ५० हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांचीही संख्या वाढताना दिसत आहे. दररोज नागरीक आरोग्य केंद्रांबाहेर गर्दी करत आहेत. मात्र लसींचा तुटवड्यामुळे विना लस घेताच रिकाम्या हाताने घरी परतत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून लस न मिळाल्यामुळे लसीकरण बंद होते. सोमवारी (दि.१३) पहाटे लसींचा पुरवठा करण्यात आला. मात्र केवळ पाच हजारांचा साठा शहरास मिळाल्याने पुन्हा एकदा लस घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. पाच हजारांचा साठा अवघ्या दोन ते तीन तासातच संपला त्यानंतर पुन्हा लसींची प्रतीक्षा करणे मनपाच्या वाट्याला येत आहे. आज केवळ पाच केंद्रांवर पहिला डोस तर ३४ केंद्रांवर दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा उद्रेक होणार नाही. मात्र लसींच्या वारंवार निर्माण होणाऱ्या तुटवड्यामुळे आणि कमी पुरवठ्यामुळे शहरात लसीकरणाला ब्रेक लागत आहे. मंगळवारी पहाटे शहराला केवळ ५ हजारांचा साठा मिळाला होता.
मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने पहिल्या डोससाठी केवळ पाच केंद्र ठेवण्यात आले आहेत. यात शहाबाजार, सादात नगर, कैसर कॉलनी, चेतना नगर, गणेश कॉलनी येथील आरोग्य केंद्रांमध्ये पहिला डोस मिळेल तर दुसऱ्या डोससाठी शहरातील एकूण ३४ केंद्र ठेवण्यात आले आहेत. आणखी लसींचा साठा कधी मिळेल याबाबत काहीही सांगता येणार नसल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का ?’
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित – वनीथा श्रीनिवासन
- मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पोहचले राहुल गांधींच्या भेटीला
- मला विश्वास आहे पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
- भुमरेंनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, शेत बळकावल्याचा महिलेचा आरोप


