औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ५ एप्रिल पासून शहरात महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेला पहिल्या दिवसांपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १६ जानेवारीपासून आजपर्यंत लसीकरणाने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या लाटेने महाराष्ट्रात अधिक थैमान घातले आहे. त्यातच मुंबई, अमरावती, यवतमाळ, नागपुर पाठोपाठ औरंगाबादेतही कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना लस उपलब्ध करून देत १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला प्रारंभ केला. त्यानुसार औरंगाबाद शहरातही लसीकरण केले जात आहे.
त्यानुसार आजवर पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी, दुसर्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स तर तिसर्या टप्प्यात ४५ वर्षांवरील आजारी असलेल्या आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान, संसर्ग वाढत असल्याने आता केंद्राने ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औरंगाबाद शहरात पालिकेने सोमवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जम्बो मोहिमेला प्रारंभ केला.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणीत केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीचा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवणार
- एसटी कामगारांना आर्थिक भत्ता द्या, १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा : मनसे
- मोठी बातमी : राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन ?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
- देशातील ‘या’ मोठ्या बँकेने खात्यातून होणाऱ्या चोरीविषयी ग्राहकांना केले अलर्ट
- कोरोना रुग्णांचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सने लढवली शक्कल

