Share

परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीत भाजप कनेक्शन उघड; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर पोलिसांना ८८ लाख रुपये सापडले होते. आता त्यांच्याकडे आणखी रोख दोन कोटी रुपये व सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी या कंपनीनेच केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. दरम्यान यावरूनच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पाटील (Atul Londhe Patil) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीत BJP कनेक्शन आणि या घोटाळ्याची पाळेमुळे फडणवीस सरकारच्या काळातील असल्याचे उघड होताच भाजप नेत्यांनी CBI चौकशीची कोल्हेकुई सुरु केली आहे. CBI ला बोलावून आपल्या लोकांना वाचवायचे आणि विरोधकांची बदनामी करायची ही भाजपची कार्यपद्धती झाली आहे. असे ट्वीट
अतुल लोंढे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!