Share

अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांविरुद्ध दाखल केला १ रुपया मानहानीचा दावा

Published On: 

नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. ४० टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप केला होता.

यावरून किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फौजदारी व दिवाणी न्यायालयात १ रुपया मानहानीचा दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी लोंढे यांनी सोमय्यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत त्यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. अॅड. सतीश उके यांनी लोंढे यांचे वकील म्हणून दावा दाखल केला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नागपूर (कोर्ट क्रमांक ३) दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.

सोमय्या यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना सोमय्या यांनी आरोप केले. सार्वजनिकरीत्या असे खोटे आरोप करणे काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली होती. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेकॉर्ड केले असून याची तक्रार नागपूर पोलिस आयुक्तांकडे केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!