🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी “आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, याची जबाबदारी सरकारची असते”, असा गंभीर आरोप केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांना सुरक्षा असते, त्यांच्या कुटुंबियांना नाही असे म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या… तुमचाही हिशोब होईलच!”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारलाच इशारा दिला आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरोप केला आहे की, आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात.”
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले, नावावरून नवा वाद पेटण्याची शक्यता !
- Sharad Pawar : …तर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार? ही वेळ बाळासाहेबांच्या भुमिकेनुसार निर्णय घेण्याची
- Sanjay Shirsat : “शिवसेनेत भांडण लावून राष्ट्रवादी…”, संजय शिरसाट यांचा आरोप
- Prajakta Mali : “तू ज्या कलाकृतीत असते ती हिट का होते?” यावर प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा! म्हणाली…
- Haribhau Rathod : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
