मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु असून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अशातच राज्य सरकारने कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.आत्तापर्यंत संपात सहभागी झालेल्या २९७ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले असून २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात ट्विट करत भातखळकर म्हणाले आहेत की,’संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.’ तसेच कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल, असेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल. pic.twitter.com/xwoiMSpQyo— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 20, 2021
दरम्यान, आज पुन्हा एकदा रोजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातील एकूण २९७ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावर रूजू न झाल्यास यापुढेही निलंबन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले ‘या’ गायिकेचे आभार
- व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल
- प्रत्येक चुकीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात जनतेला एकजुटीने उभे राहावे लागेल- संजय राऊत
- रत्नागिरीत रोजंदारीवर काम करणाऱ्या ८६ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन


