मुंबई : राज्य सहकारी बँकेशी संबधित एकूण 7 ठिकाणी ED कडून धाडी टाकल्या असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, या सर्व धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.
सहकारामुळे राज्यात बदल आणि विकासदेखील झाला आहे. पण याच सहकाराला नावदेखील ठेवण्याचे काम केलं गेलं आहे. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे असं होत नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
'काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहे. त्याचा फटका माझ्या सारख्याला बसतो' असे @AjitPawarSpeaks म्हणतायत. हे म्हणजे भुता तोंडी रामरक्षा.
आता ते बोललेच आहेत तर त्यांनी उदाहरणादाखल किमान एक दोन नावे तरी सांगावीत. होऊन जाऊदे दूध का दूध पानी का पानी. pic.twitter.com/GAeSLMzxCO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2021
अजित पवारांच्या या दाव्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बोचरी टीका केली आहे. ‘ ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहे. त्याचा फटका माझ्या सारख्याला बसतो’ असं अजित पवार म्हणतायत. हे म्हणजे भुता तोंडी रामरक्षा. आता ते बोललेच आहेत तर त्यांनी उदाहरणादाखल किमान एक दोन नावे तरी सांगावीत. होऊन जाऊदे दूध का दूध पानी का पानी,’ असं आव्हान देखील भातखळकर यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेणार, गर्दी वाढल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार’
- ‘बेळगाव महापालिकेवर शिवरायांचाच भगवा फडकणार’; संजय राऊत यांचा दावा
- ‘दिल्ली विधानसभेत सापडला लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणारा ब्रिटिशकालीन बोगदा’
- कुठे चिखल तुडवत, तर कुठे बैलगाडीतून धनंजय मुंडे नुकसानग्रस्तांच्या बांधावर
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

