मुंबई : काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर छापा टाकून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. यानंतर, शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडी व सीबीआयच्या तपासावर शंका व्यक्त केली होती.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी या तपास संस्थांसह भाजपवर निशाणा साधला आहे. ‘लडाख आणि काश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे,’ अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.
‘हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही’ असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून लगावला आहे.
संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘देशाच्या सीमेवरील दुश्मनांशी लढण्यासाठी सीबीआय आणि ईडीला पाठवा; शिवसेनेचा केंद्राला खोचक सल्ला… सीबीआय आणि ईडीला कुठे पाठवायचं ते केंद्र सरकार बघून घेईल, सध्या घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा…’ अशी बोचरी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
देशाच्या सीमेवरील दुश्मनांशी लढण्यासाठी सीबीआय आणि ईडीला पाठवा; शिवसेनेचा केंद्राला खोचक सल्ला…
सीबीआय आणि ईडीला कुठे पाठवायचं ते केंद्र सरकार बघून घेईल, सध्या घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा… pic.twitter.com/YREjnp9VY0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- धक्कदायक : कोरोनाशी महिनाभर झुंज देणाऱ्या भाजप आमदाराचे निधन
- ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही’
- कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांनाचं; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका!
- हुतात्मा नितीन भालेराव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंतिम संस्कार
- आटपाडीच्या बाजारात तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

