🕒 1 min read
मुंबई: “निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट गुणवत्तेच्या आधारावर दिले जाईल. तुम्ही कितीही ताकदवान असाल, कितीही मोठे असाल तरी तुम्ही गरीब, शेतकऱ्यांसोबत नसाल तर तुम्हाला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही”, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी तेलंगणातील वारंगलमध्ये केले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी कॉंग्रेसला खोचक सवाल केला आहे.
“राहुल गांधींनी तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन दिलं आहे. मग ज्या राज्यात तुम्ही सत्तेत सामील आहात त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी असं काय पाप केलं आहे की, त्यांना तुम्ही कर्ज माफी देत नाही? थापा मारायच्या परदेशात जायचं, परदेशातून यायचं परत थापा मारायच्या.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली तर, शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करून योग्य आधारभूत किंमत देणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच तेलंगणात अशा हजारो भगिनी आहेत, ज्यांच्या पतीने आत्महत्या केलीय. ही जबाबदारी कुणाची? असा सवाल करत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये…”, अतुल भातखळकरांचा टोला
- “….त्याला मस्तवाल करणाऱ्यांनाच जनतेने सत्तेवर आणले”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- “हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो”- सुधीर मुनगंटीवार
- “भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला” – गुलाबराव पाटील
- “फुले, शाहुंचे विचार आंबेडकरांनी पुस्तकात बंद केले”- जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
