Share

‘वाघ आमच्या इशाऱ्यावर सरपटतो, असंही चाललं असतं’; भातखळकरांचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असे सांगितले. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला होता.

यावरून महाविकास आघाडीतील वर्चस्ववादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. दरम्यान, वाघाच्या इशाऱ्यावर शिवसेनेने अद्याप प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र, भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधणे सुरू केले आहे. आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक टिप्पणी केलीये. ‘वाघ आमच्या इशाऱ्यावर सरपटतो, असंही चाललं असतं’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

ओबीसी चिंतन बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असे म्हटले. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असे सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!