Share

‘…मग भाजप नेत्यांवर टीका करणारे मोकाट गुरं जावई आहेत का सरकारची?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजकीय मतभेदामुळे होणारी वादावादी अनेकदा जीवावर बेतल्याच्या घटना समोर येत असतात. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी करणे चांगलंच भोवलं आहे.

या नेत्यांचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. याप्रकरणी, आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजकीय नेत्यांची फोटो मॉर्फ करुन बदनामी केल्याप्रकरणी नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यांनतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘राज्यात फक्त ठाकरे सरकारशी संबंधित नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे गुन्हा आहे का? बाकी ४० पैसेवाल्यांना खुली सूट दिली आहे भाजपा नेत्याविरुद्ध बेशरम वक्तव्ये करायला. ती मोकाट गुरं जावई आहेत का सरकारची?’ असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची काही तरुणांनी खिल्ली उडवून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!