मुंबई: संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक रुग्णालयात बेडस, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने लोक दगावत आहेत. यामुळे देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. रोज समोर येणारी मृतांची संख्या पाहून कुणालाही धडकी भरेल. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे अनेक लोक दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचे दिसत आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही मुंबई सोडून खंडाळा येथील फार्महाऊसवर राहायला गेले आहेत ,तर हृतिक जुहूमध्येच त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती समजत आहे.
हृतिकचे वडील म्हणजेच अभिनेता राकेश रोशन फक्त महत्त्वाच्या मीटिंग्स व कामासाठीच मुंबईत येतात. तसा त्यांचाही मुक्काम खंडाळा फार्महाऊसवर आहे. त्यांची पत्नी पिंकी रोशनही त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये राहत असल्याचे समजत आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे. यामुळे खबरदारी म्हणून राकेश रोशन यांनी मुंबईबाहेर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना काही महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या ६७ व्या वाढदिवशीच ही बातमी समोर आली होती. यानिमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांना खोलीच्या बाहेर सरप्राईझ गिफ्ट दिले. ज्याचा सोशल मीडियावर फोटो शेअर करून करत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, अशी आशा व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

