Share

.. ही लस ठाकरे सरकारने घरबसल्या चुलीवर बनवली की इटालियन सरकारने दिली?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. तसेच येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण होणार आहे. ओमायक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकायदायक नाही असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar)  यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात ८ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १००% लसीकरण होईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेशा लसी देत नाही म्हणून सारखे गळा काढता, मग ही लस ठाकरे सरकारने घरबसल्या चुलीवर बनवली की इटालियन सरकारने दिली? असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान ओमायक्रॉन संबंधी राज्य सरकार पूर्ण खबरदारी घेत असून दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी केली जात असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच हायरिस्क कंट्रीजमधून येणाऱ्या प्रवशांचे आरटीपीसीआर करण्यात येत आहेत. स्क्रीनिंग देखील करण्यात येत असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!