मुंबई: एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या फंदात पडू नका असा सल्ला दिला. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“अहंकार आणि माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी आता किमान स्वतःला सांभाळावं. भाजपा नेत्यांना शहाणपणाचे सल्ले देण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?
“आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की, तुम्ही या फंदात पडू नका. जे पहाटे झालं ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. तुमच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे”. असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.
महत्वाच्या बातम्या:
- Shivsena : राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण; शिवसैनिक आक्रमक
- Chitra wagh : “सर्वज्ञानी संपादकांनी या झमेल्यात पडू नये, कर्माची फळे…” ; चित्रा वाघ यांचा राऊतांना सल्ला
- Salman Khan : ‘या’ मराठी चित्रपटामध्ये दिसणार बॉलिवूडचा भाईजान सलमान खान
- Atul Bhatkhalkar : “सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक…”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना इशारा
- Shivsena Vs Bjp : आमदारांच्या बंडाच्या मागे फक्त ईडी-आयकर विभाग, सीबीआयचा हात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

