🕒 1 min read
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले आहे. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले आहेत.
अपेक्षेनुसार @nawabmalikncp यांनी अंमली पदार्थांच्या कारभाराविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या NCB वर निशाणा साधला आहे.
NCB वर खंडणीखोरीचा आरोप करणाऱ्या मलिक यांनी ड्रग्ज घेणाऱ्यांची बाजू घेण्यासाठी किती खंडणी घेतली याचे उत्तर द्यावे. जावयाने दिले तरी चालेल.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2021
नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री यांनी एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर केलेले वक्तव्ये आणि खुलाशामुळे आता ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे.ते म्हणाले, अपेक्षेनुसार नवाब मलिक यांनी अंमली पदार्थांच्या कारभाराविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या NCB वर निशाणा साधला आहे. NCB वर खंडणीखोरीचा आरोप करणाऱ्या मलिक यांनी ड्रग्ज घेणाऱ्यांची बाजू घेण्यासाठी किती खंडणी घेतली याचे उत्तर द्यावे. जावयाने दिले तरी चालेल असा टोला देखील लगावला आहे.
शाहरुखने नवाब मलिकना वकीलपत्र दिलं असतं तर आर्यनला जामीन मिळाला असता का?
की बिनडोक तर्क केल्याबद्दल कोर्टाने हाणले असते? मानेशिंदे यांच्यासारखा खमक्या वकील असताना कोर्टाने NCB ला कोठडी दिली कारण पुरावे ठोस होते. आर्यनच्या निमित्ताने मलिक जावयाचा खुन्नस काढतायत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2021
भातखळकर म्हणाले, शाहरुखने नवाब मलिकना वकीलपत्र दिलं असतं तर आर्यनला जामीन मिळाला असता का? की बिनडोक तर्क केल्याबद्दल कोर्टाने हाणले असते? मानेशिंदे यांच्यासारखा खमक्या वकील असताना कोर्टाने NCB ला कोठडी दिली कारण पुरावे ठोस होते. आर्यनच्या निमित्ताने मलिक जावयाचा खुन्नस काढतायत.
महत्वाच्या बातम्या:
- देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितची एन्ट्री; आंबेडकरांकडून विश्वासू सहकाऱ्याला तिकीट
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- ‘क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

