मुंबई: राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महापालिकांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. पण, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे पोटात एक व ओठात एक सुरू आहे. शिवसेना त्यांच्या सोयीप्रमाणे वाॅर्डरचना करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे. शिवसेना मोठा भाऊ म्हणून त्यांचा जिल्ह्यात आदर करू; पण बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे म्हणे.
शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी केली आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली हे बरं खपवून घेतलंत… pic.twitter.com/uhUaUuHiNO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2021
बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे म्हणे. शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी केली आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली हे बरं खपवून घेतलंत. असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’


