Share

‘कुणी म्हणाले वेडी कुठली…’ महिला दिनी अमृता फडणवीस यांचं खास गाणं येणार !

Published On: 

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे ! त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे. मात्र, ट्रोलर्सना भाव न देता त्यांनी आपली कला जोपासणार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.

आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी आपलं नवं गाणं येणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खास मराठमोळ्या पेहरावातील फोटो देखील शेअर केले आहेत. हे गाणं स्त्रीशक्तीला समर्पित असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचं ट्विट –

‘जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोकणे शक्य नाही ! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, याआधी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी इंग्रजी गाणं रिलीज केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!