मुंबई- महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारमधील मंत्री ठाकरे सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचत आहेत तर विरोधक सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवून देत आहेत.यातच खासदार नारायण राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री अडकले आहेत. त्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटींच कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत नेलं असल्याचंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हाती गाडीचं स्टेरींग आहे, राज्याचं नाही. महाराष्ट्राला ड्रायव्हर द्यायचा नव्हता, मुख्यमंत्री द्यायचा होता. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले. महाराष्ट्राला ही सत्ता पोषक नाही.हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत. दोन पक्षापैकी एक पक्ष येईल किंवा राष्ट्रपती राजवट लागू शकेल. राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं असं राणे म्हणाले.
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांची ताकद पहिली आहे.बंडखोरी करणाऱ्यास येथे थारा नाही.सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढायचे आहे. प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचून श्रीकांत देशपांडे यांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडा. या संवेदनशील नेत्यास निवडून आणण्यासाठी आपले योगदान द्या. pic.twitter.com/a59zH3UzeR
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 27, 2020
दरम्यान, महाविकास आघाडीने आता राणे यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आरोप करत सुटले आहे. फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
- कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया : मुश्रीफ
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी आणि हप्ता सरनाईक यांना कसा मिळतो ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

