Share

Atul Bhatkhalkar : “साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला…”, अतुल भातखळकरांनी NCP ला डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र या निर्णयावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

“साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला अख्खा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीने सदरील निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले कि, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात आले आहेत.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!