🕒 1 min read
मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर(Sameer Wankhede) लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लाच प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकही नेमण्यात आले होते. परंतु या प्रकरणात अद्यापही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे हा तपास काही काळासाठी थांबविण्यात आला आहे. याला अनुसरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’खोदा पहाड आणि चुहा पण सापडला नाही. समीर वानखेडे यांच्याविरोधात बोटभर पुरावा देखील सापडला नाही. तरीही रिकामटेकडे नवाब मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन नवे बिनबुडाचे आरोप करतायत. लाज न लज्जा’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
खोदा पहाड आणि चुहा पण सापडला नाही. समीर वानखेडे यांच्याविरोधात बोटभर पुरावा देखील सापडला नाही. तरीही रिकामटेकडे @nawabmalikncp
नव्या पत्रकार परिषदा घेऊन नवे बिनबुडाचे आरोप करतायत. लाज न लज्जा. pic.twitter.com/H4ZaggifzG— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 23, 2021
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. फक्त एवढेच नाही तर हे प्रकरण ड्रग्जचं थेट खंडणी आणि वसुलीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
