🕒 1 min read
मुंबई : काल दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये शरद पवार यांची एन्ट्री होताच ‘अजिमो-शान-शहंशाह’ हे गाणं लावण्यात आलं होतं. यावरून भाजपने राष्ट्रवादीला तसेच शरद पवार यांना धारेवर धरलं आहे. अशातच याच मुद्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही शरद पवार यांच्यावर हल्लबोल केला आहे.
अतुल भातखळकर यांचे वक्तव्य-
शरद पवार जाणते राजे नसून मुघल शहेनशाह आहेत. साडे तीन जिल्ह्यांचे अज़ीम ‘ओ-शान शहंशाह आहेत,असं म्हणत असं म्हणत अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट देखील केलं आहे.
दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत .पुढे ते असंही म्हणाले की, कोणते मुघल आहेत? ते आपल्याला माहितीच आहे.
ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मरहबा जनाब शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह, फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली ‘शहंशाह’ हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?
महत्वाच्या बातम्या :
- Sada sarvankar | सदा सरवणकरांना गोळीबार करणं पडलं महागात, पिस्तुल ताब्यात घेण्यासाठी पोलीस दाखल
- Ajit Pawar | नाराजी नाट्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण! म्हणाले, “वास्तविक मला तिथं कोणी…”
- Neelam Gorhe | “नितेश राणेंच्या हातात मच्छर मारायची बॅट, त्याने…” ; नीलम गोऱ्हेंची टीका
- Uday Samant | नाना पटोलेंसमोर रिफायनरी विरोधकांकडून उदय सामंतांना जाळून टाकण्याची धमकी
- Anil Parab | अखेर पर्यावरण विभागाकडून आदेश! अनिल परबांचं रेसाॅर्ट होणार जमीनदोस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
