Share

२० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपकऱ्यांसह प्रवाशांचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी गेल्या ४५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी लढा उभारलेला आहे. आत्तापर्यंत अनेकांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली. अनेकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र तरीही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरुन हटले नाहीत. आता सोमवारी (दि.२०) होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लांबलेल्या या संपावर आता तरी तोडगा निघेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण यांसह इतर मागण्यासाठी ७ नोव्हेंबर पासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. आता महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र आत्तापर्यंत मोजकेच कर्मचारी रुजू झालेले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. २० डिसेंबर रोजी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर आमच्या या संपाची पुढील दिशा ठरवली जाईल. अशी माहिती औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी मकरंद कुलकर्णी, प्रकाश डंख, जयश्री हजारे, मच्छिंद्र बनकर, मधुकर हुले यांनी दिली.

त्यामुळे आता कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचेही लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. त्यानंतरच संपकरी एसटी कर्मचारी आपली पुढील दिशा ठरवणार आहेत. राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने इतर संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता न्यायालय कर्मचाऱ्यांच्या संपावर उद्या काय निर्णय घेईल त्यानुसार एसटीचा संप मिटतो कि आणखीनच वाढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

औरंगाबाद पुणे मार्गावर धावल्या १८ शिवशाही

रविवारी (दि.१९) विविध मार्गावर औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून, ४७ बस धावल्या. आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर ७ बसच्या अठरा फेऱ्या करण्यात आल्या. यात २५७ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर एका बसने २ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ५ शिवशाही बसच्या १० फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १८ शिवशाही बसच्या ३६ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ४ बसने १६ फेऱ्या करण्यात आल्या. गंगापूर-औरंगाबाद एका बसच्या २ फेऱ्या, गंगापूर-वैजापूर एका बसच्या २ फेऱ्या अशाप्रकारे एकुण ४७ बसने २२० फेऱ्या केल्या असून ३३१६ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!