Share

पंतप्रधानांकडून दखल; मात्र नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री फिरकेनात- राधाकृष्ण विखे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. मात्र, राज्यातील अनेक मंत्री अद्याप नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरकले नाहीत, असा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे, परंतु राज्यातील अनेक मंत्री झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप फिरकले नाहीत. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा गांभीर्य लक्षात घेऊन अशा कठीण काळात शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी.

खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहिले तर सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायलाही वेळ नसलेल्या मंत्र्यांनी आता तरी घरा बाहेर पडावे. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा आता तातडीने मदतीची घोषणा करावी.

राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट न पाहता सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. परतीच्या पावसाने ऊस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे साखर कारखान्यांसमोरही गाळपाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे आ.विखे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!