औरंगाबाद : रांजणगाव शेणपुंजी भागातील कमळापूर रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत.
रांजणगाव शेणपुंजी शिवारातील कमळापूर रोडवर एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. या
एटीएमच्या सुरक्षेचे काम हेमब सोल्युशन्स इलेक्टॉनिक सिक्युरीटी या कंपनीकडे आहे. मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास दोन चोर एटीएम सेंटरमध्ये शिरले. त्यांनी एटीएम मशीन खोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातुन सिक्युरीटी इंजिनअर आशीष भरत चव्हाण (२२, रा. राजीव गांधी नगर) यांना फोन आला.
कमळापूर रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटरमधील मशीनसोबत काहीजण छेडछाड करत असुन तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहचा असे सांगितले. त्यामुळे चव्हाण यांनी लगेच एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि चव्हाण यांनी एमटीएम सेंटरकडे धाव घेतली.
मात्र, तिथे पोहोचल्यावर आत कोणीही दिसून आले नाही. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अंदाजे २० ते २२ वयोगटातील दोघेजण रात्री १२ वाजून ५२ वाजेच्या सुमारास एटीएम तोडण्याचा व पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’


