Share

निवडणूक प्रचार थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, १ ठार २३ जखमी

Published On: 

पाटणा : बिहारमधील पाटणामध्ये निवडणुकीचा प्रचार थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात एक ठार तर २३ पोलीस जखमी झाले आहेत.

शुक्रवारी रात्री पाटणाच्या धनरुआमध्ये ग्रामस्थ आणि पोलिसांत ही चकमक झाली. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २३ पोलीस जखमी झाले आहेत. यात परिमंडळ निरक्षकासह धनरुआ पोलीस ठाण्यातील पोलिसांचा समावेश आहे. यातील काही पोलिसांची प्रकृती चिंताजणक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी सुमारे ३० ते ४० राऊंड फायर केले आहेत. तसा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदरील निवडणूक केंद्र हे संवेदनशिल असल्याने तीथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!