पश्चिम बंगाल : बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी आणि ममता बॅनर्जी सरकारमधील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यावर एका महिलेने चप्पल फेकली आहे. पार्थ यांना वैद्यकीय उपचारासाठी कोलकाता येथील ईएसआयसी रुग्णालयात नेले असता त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. महिलेच्या नातेवाईकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत म्हणून ती रुग्णालयात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.
माध्यमांशी संवाद साधताना या संतप्त महिलेने सांगितले की, “पार्थ चॅटर्जीसारखे लोक जनतेचे करोडो रुपये लुटून आपल्या घराची तिजोरी भरत आहेत. अशा भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून हॉस्पिटलमध्ये आणले जाते. पण त्यांना तर गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत, फरफटत नेले पाहिजे. मी माझ्या पेशंटसाठी औषध आणायला गेले होते. पण पार्थ यांना पाहून मला राग आला आणि मी त्यांना चप्पल फेकून मारली. ही चप्पल त्यांच्या डोक्यावर लागली असती तर मला जास्त आनंद झाला असता. असे दरोडेखोर किती दिवस सरकारी सुविधा मिळवत राहणार आहेत?”, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान आज सकाळी अर्पिता मुखर्जी हिने ईडीला सांगितले आहे की तिच्या फ्लॅटमधून जे काही पैसे जप्त केले गेले आहेत ते तिचे नाहीत आणि तिला या पैशाचा स्रोत देखील माहित नाही. तर पार्थ चॅटर्जी म्हणाले की, आपल्याला कटात अडकवले जात आहे. तर दुसरीकडे पार्थ आणि अर्पिताशी संबंधित 6 मालमत्तांवर आज सकाळपासून ईडीचे छापे सुरू आहेत.
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री बेलघारियातील अर्पिता मुखर्जी हिच्या फ्लॅटवर छापा मारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने येथील अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज पहिले आणि एंट्री डायरीही तपासली. तपासानंतर अधिकाऱ्यांना काही पुरावे मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. तर या सोसायटीचे सेक्रेटरी अमित चौरसिया यांनी माध्यमांना सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे सीसीटीव्ही फुटेज डाउनलोड करता आलेलं नाही. परंतु ते सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या फ्लॅटमधून 28 कोटींची रोकड सापडली
27 जुलै रोजी ईडीने अर्पिताच्या बेलघरियाच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. यामध्ये सुमारे २८ कोटी रुपये रोख सापडले. 18 तास चाललेल्या या छाप्यात ईडीच्या पथकाने 5 किलो सोनेही जप्त केले. फ्लॅटमधून इतके पैसे मिळाल्यानंतर अर्पिताने प्रथमच सर्व पैसे पार्थ चॅटर्जीचे असल्याची कबुली दिली होती. तर ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ-अर्पिताच्या नवे 11 बँकांमध्ये संयुक्त खाती आहेत. त्यातून 8 कोटींचे पुरावे सापडले आहेत. ही खाती लवकरच जप्त करण्याची तयारी ईडी करत आहे. तसेच ईडी पार्थशी संबंधित आणखी 15 ठिकाणी छापे टाकण्याच्या तयारीत आहे.
महतवाच्या बातम्या:
- Sanjay Raut | संजय राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने वाटले पेढे
- Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग
- Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग
- Eknath Shinde । राऊतांच्या घरातील ‘त्या’ पैशांशी शिंदेंचा संबंध?, मुख्यमंत्र्यांचं थेट स्पष्टीकरण
- Ajit Pawar | सत्कार स्विकारण्यारपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

