Share

Sanjay Raut | संजय राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने वाटले पेढे

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. काही ठिकणी शिवसैनिक रस्त्यावर देखील उतरले होते. मात्र राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्रायव्हरने चक्क पेढे वाटले आहेत. प्रकाश राजपूत असे या ड्रायव्हरचं नाव आहे. राऊतांना अटक झाल्यावर ते धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे होते. मात्र त्यांनी थेट दिल्ली गाठली.

दिल्लीत जाऊन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी राऊतांवर टीकाही केली. संजय राऊत यांनी चुकीचं काम केलंय, त्यांनीच शिवसेना संपवली, असा प्रत्यक्ष आरोप त्यांनी यावेळी केला. हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे प्रकाश राजपूत हे काही वेळातच प्रसिद्धीच्या जातात आले आहेत. तर राजपूत हे १९९३ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते.

राऊतांना ४ दिवसाची ईडी कोठडी
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे ४ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नऊ तासांच्या छाप्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले होते. तपासात सहकार्य न केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. 1,000 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने त्यांची आतापर्यंत 16 ते 17 तास चौकशी केली. यावर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, घोटाळा झालेल्या पैशातून (१.६ कोटी रुपये) अलिबागच्या किहीम बीचवर जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. सपना पाटकर यांच्या नावावर भूखंड घेण्यात आला. प्रवीण राऊत हा संजय राऊतचा फ्रंट मॅन असल्याचेही तपासात समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!