Share

मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला

Published On: 

मुंबई : शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर रात्री जीवघेणा हल्ला झालाय. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यातून आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह 2 कार्यकर्ते जखमी झालेत.

शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे त्रास होतो अशी स्थानिक रहिवाशांची तक्रार होती. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीही काम थांबवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून काते बचावले असले तरी त्यांचे सुरक्षारक्षक आणि अन्य दोन सहकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती

पुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!