Share

सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यातून काल त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले. मात्र या हल्ल्यात त्यांचे सात सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर लाइव्ह भाषण करत असताना ही घटना घडली. राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो सैनिकांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून बचावले आहेत.
हल्ल्यानंतर थोड्याचवेळात व्हेनेझुलेलाचे सुचना मंत्री जॉर्ज रोड्रिग्ज यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता, पण सुरक्षारक्षकांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!