नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
दरम्यान अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आता जगासमोर आणखी एका नव्या विषाणूचे सावट आले आहे. दक्षिण आफ्रिका आणि जगातील अन्य देशांमध्ये कोरोना व्हायरसचा आणखी एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचा धोका आहे. इतकचं नाही तर या व्हेरिएंटमुळे लसीचा काही प्रभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज(NICD) आणि क्वाजुलु-नेटाल रिसर्च इनोवेशन अँन्ड सीक्वेसिंग प्लॅटफॉर्मच्या संशोधकांनी या वर्षीच्या मेमध्ये देशात पहिल्यांदाच संभाव्य व्हेरिएंट C.1.2 चा शोध लावला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनल डिसीजेसने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, हा प्रकार आतापर्यंत आढळलेल्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. हा प्रकार पहिल्यांदा आफ्रिकेत मे महिन्यात सापडला.
तेव्हापासून, या प्रकाराचे रुग्ण चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये सापडले आहेत. अभ्यासक म्हणाले आहेत की, C.1.2 प्रकारचे इतर ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ आणि ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ प्रकारांपेक्षा अधिक म्युटेशन झाले आहे. तसेच शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान सापडलेल्या व्हेरिएंटपैकी, C.1 व्हेरिएंटपेक्षा C.1.2 मध्ये अधिक बदल दिसून आले आहेत. याच कारणामुळे याला व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकाऱ्यांविषयीची अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट, शेतकरी विरोधी शिवसेनेचा तीव्र निषेध..!’
- तोंडाच्या वाफा फक्त जनतेसाठी आहेत काय मुख्यमंत्री महोदय ?
- सोयगाव वनपरिक्षेत्रातील कोऱ्हाळा येथील 3 रानडुकरांचे शिकार प्रकरण; ७ आरोपींचा जामीन नामंजूर
- ‘आम्ही राणेंचे नाही राज ठाकरेंचे सैनिक आहेत,’ अविनाश जाधवांचा इशारा
- मराठवाड्यात दोन दिवस पावसाचे; वरुणराजा जोरदार बरसणार!


