Share

‘शेतकाऱ्यांविषयीची अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट, शेतकरी विरोधी शिवसेनेचा तीव्र निषेध..!’

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप २०२० मधील नुकसान भरपाईच्या अनुषंगाने पालकमंत्री व कृषीमंत्री यांना बैठकीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली होती. मात्र, त्यांची शेतकऱ्यांविषयाची अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट झाली असल्याची टीका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. यामुळे शेतकरी विरोधी शिवसेनेचा आपण निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

या संदर्भात आमदार पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी मंत्री आणि शिवसेनेवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘उस्मानाबाद जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप २०२० मधील नुकसान भरपाईच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री व माननीय कृषीमंत्री यांना आजच्या बैठकीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली होती. अन्नदाता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते गांभीर्य दाखवतील व अनेक महिन्यांपासून प्रलंबित बैठक निदान व्हर्च्युअली उपस्थित राहून तरी संवेदनशीलता दाखवतील असे वाटत होते. परंतु ते सहभागी न झाल्याने शिवसेनेची शेतकाऱ्यांविषयीची अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. खरीप २०२० मधील पीक विम्यापोटी कंपनीला ५०० कोटींहून अधिकचा नफा होत आहे. वारंवार मागणी करून देखील कृषी मंत्री बैठक का बोलावत नाहीत? हे आता जनतेला समजून आले आहे.’

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपला लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘या विषयावर न्यायालयीन लढा तर सुरू आहे मात्र शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर बैठकीची मागणी केली होती. आजच्या बैठकीमध्ये कृषी आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यप्रणाली निश्चित केलेली आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!