Share

अयोध्येनंतर काशी,मथुरेची चर्चा;पवारांना वाटतेय ‘ही’ भीती

Published On: 

मुंबई : बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.यातच ‘अयोध्येनंतर आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचे दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यात काही लोकांनी कृष्णाच्या जन्मस्थानी असलेली सतराव्या शतकातील इदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मंदिराची 13 एकर जागा ही कटरा केशव देव मंदिराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र कोर्टाने हा दावा दाखल करून घेतला नाही.

शरद पवार यांनी अयोध्येत ज्या प्रमाणे मशीद पाडण्यात आली तसाच प्रकार काशी, मुथरेतही घडू शकतो अशी भीती स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे. ‘आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे’, असा शब्दांत पवार यांनी भविष्यातील धोक्यांचे संकेत दिले.

दरम्यान,बाबरी मशीद निकालावर देखील पवारांनी काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कारभारावरच निशाणा साधला आहे. “मोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती, या निकालावर अधिक बोलणार नाही” असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!