Share

तुकाराम बीजनिमित्त देवेंद्र फडणवीस देहूत तुकोबांच्या चरणी; फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

देहू: आज (२० मार्च) तुकाराम बीजनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देहूत जगदगुरु संत तुकोबारायांचे दर्शन घेतले. त्यांचे येथील फोटो त्यांनी ट्वीटवर पोस्ट केली आहेत. तसेच “तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीने”, अशी पोस्टही त्यांनी केली आहे.

“आतां असों द्यावी दया। तुमच्या लागतसें पायां॥ आज जगदगुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा. जगदगुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय…॥ जय जय रामकृष्ण हरि॥”, अशी पोस्ट करत देहू येथे शिळेचे, जगदगुरु संत तुकोबारायांचे दर्शन घेण्याचे आणि चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘तुकाराम बीज, म्हणजे  संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. ते इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचे  विठ्ठल हे तुकारामांचे आराध्यदेव होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!